वाशिम जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा महिलांच्या हाती

By Admin | Updated: June 11, 2016 03:16 IST2016-06-11T03:16:11+5:302016-06-11T03:16:11+5:30

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव

Women's power again in the hands of Washim Zilla Parishad | वाशिम जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा महिलांच्या हाती

वाशिम जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा महिलांच्या हाती

वाशिम: गत काही दिवसांपासून राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत १0 जून रोजी मुंबई येथे झाली असून, वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले. आतापासूनच स्थानिक नेतेमंडळी आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने ह्यराजकारणह्ण तापले आहे.
वाशिम जिल्हा परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७, शिवसेना १0, राष्ट्रवादी काँग्रेस ८, भारतीय जनता पार्टी सहा, अपक्ष सहा, भारिप-बहुजन महासंघ तीन, मनसे एक असे पक्षीय बलाबल आहे. सध्या जिल्हा परिषदेवर तीन अपक्षांच्या सहकार्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आता अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निघाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व भाजपा युतीनेही मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते. काँग्रेसकडे स्वत:चे १७ व दोन अपक्ष असे १९ सदस्य, तर राष्ट्रवादीकडे आठ सदस्य असल्याने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ सध्यातरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे असल्याचा दावा दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला. दरम्यान, जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर असलेल्या शिवसेना-भाजपा युतीनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न चालविल्याने चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एका राजकीय पक्षाचे सहा सदस्य फोडून वेगळा ह्यबह्ण गट स्थापन करण्याचा प्रयत्न आणि चार अपक्षांना सोबतीला घेऊन विरोधकांनी सत्तांतर घडवून आणण्यासाठी व्यूहरचना केल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे. मात्र, आता अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने ह्यत्याह्ण पक्षाचे सहा सदस्य विरोधकांसोबत जातात काय? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीय आहे. विरोधकांची ही व्यूहरचना भेदून सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सतर्क असल्याने विरोधकांना कितपत यश येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे.

Web Title: Women's power again in the hands of Washim Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.