महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून स्त्रीजनार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:35+5:302021-02-05T09:22:35+5:30

संघटनेचे मुख्य संयोजक गंगाधर कांबळे आणि प्रदेश संघटक वनमाला पेंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. भोकर येथील ...

Women's movement on the issue of women's oppression | महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून स्त्रीजनार्थ आंदोलन

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून स्त्रीजनार्थ आंदोलन

संघटनेचे मुख्य संयोजक गंगाधर कांबळे आणि प्रदेश संघटक वनमाला पेंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

भोकर येथील एका चिमुकल्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून, बिलोली तालुक्यातील एका मूकबधिर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या, मालेगावनजीक धावत्या लक्झरी बसमध्ये क्लिनरने एका तरूणीवर बलात्कार केला. यासह घडलेल्या विविध घटनांतील आराेपींना कडक शिक्षा करण्याची मागणी यावेळी आंदाेलकांनी केली.

यावेळी संघटनेचे मुख्य संयोजक गंगाधर कांबळे, प्रदेश संघटक वनमाला पेंढारकर यांच्यासह वाशिम जिल्हा समन्वयक सचिन कव्हर पाटील, जिल्हा संघटक सुनील बांगर, मंगलाताई कांबळे, रवी खंडारे, अमोल घोडे, दादाराव विठ्ठल वैरागडे, सिंधुताई भालेराव, शोभाबाई बांगर, यमुना बेलखेडे, ताई कांबळे, पुंडलिक शिंदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Women's movement on the issue of women's oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.