दारुचे दुकान बंद करण्यासाठी युवकांसह महिलांचा पुढाकार
By Admin | Updated: July 11, 2017 19:13 IST2017-07-11T19:13:26+5:302017-07-11T19:13:26+5:30
वाशिम : शहरात सुरु होत असलेल्या देशी दारु दुकानाच्याविरोधात शहरातील युवकासह महिलांनी पुढाकार घेतला असून कोणत्याही परिस्थितीत आपल्या परिसरात दारुचे दुकान सुरु न करण्याचा चंग बांधला आहे.

दारुचे दुकान बंद करण्यासाठी युवकांसह महिलांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरात सुरु होत असलेल्या देशी दारु दुकानाच्याविरोधात शहरातील युवकासह महिलांनी पुढाकार घेतला असून कोणत्याही परिस्थितीत आपल्या परिसरात दारुचे दुकान सुरु न करण्याचा चंग बांधला आहे.
राज्य महामार्गपासून ५०० मिटर दूर दारुचे दुकान असावे या नियमामुळे अनेक दारुची जुनी दुकाने बंद झालीत. बंद झालेल्या दुकानदारांनी शहरात आपला मार्ग वळविला. दारु पिणाऱ्यांचा त्रास होवू नये म्हाून युवकांसह महिलांनी आंदोलन छेडून दारु दुकानाला विरोध दर्शविला आहे. गवळीपुरासह ईतर भागातील महिलांनी या संदर्भात १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.तर शहरातील जय भवानी परिसरात सुरु झालेली वाईन शॉपी बंद करण्यात यावी यासाठी युवकांनी पुढाकार घेतला असून वाईन शॉपीचे अंतर मोजले असता ते ५०० मिटरच्या आत भरले आहे. त्यामुळे ही वाईन शॉपी उठते की काय याकडे युवकांचे लक्ष लागले आहे.