बेलखेड गावच्या महिला दारुबंदीसाठी एकवटल्या

By Admin | Updated: February 17, 2015 01:43 IST2015-02-17T01:43:10+5:302015-02-17T01:43:10+5:30

गाव दारूमुक्त होण्यासाठी गावातील महिला साधतात गावक-यांशी संवाद.

The women of the village of Belchheed gathered for liquor ban | बेलखेड गावच्या महिला दारुबंदीसाठी एकवटल्या

बेलखेड गावच्या महिला दारुबंदीसाठी एकवटल्या

कारंजा लाड (जि. वाशिम) : कुटुंबाबरोबर गावात शांतता व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी व गावासोबत कुटुंब व्यसनमुक्त राहावे याकरिता महिला एकवटल्या असून, गाव दारूमुक्त होण्यासाठी गावातील संपूर्ण महिला एकत्र येऊन गावकर्‍यांशी संवाद साधतात. तसेच या हेतूने गावातील महिलंी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता या विषयावर महिला सुसंवाद सभेचे आयोजन केले होते. कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या बेलखेड गावातील महिलांच्या वतीने दारूबंदीकरिता महिला सुसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण सभापती ज्योतीताई गणेशपुरे, सरपंच्या संगीता अरुण वानखडे, प्रमुख मार्गदर्शक जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, अखिल गुरुदेव सेवा मंडळाचे अजीवन प्रचारक हभप नामदेवराव गव्हाळे महाराज, तंटामुक्तीचे प्रचारक पवन मिङ्म्रा, गुरुदेव सेवाङ्म्रम समितीचे अध्यक्ष सुनील देशमुख, आदर्श गाव समितीचे संस्था प्रतिनिधी प्रफुल बानगावकर, अंबादास खडसे, कामरगाव पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक जाधव, मोहन कडू, दिवाकर हिंगणकार, अरुण वानखेडे, नीलेश तुरक यांची उपस्थिती होती. यावेळी महिला सुसंवाद सभेत गावातील महिला मनोगत व्यक्त करीत म्हणाल्या की गावात दारूबंदी झाल्यास प्रत्येक महिलांचे कुटुंब सुखी होऊन आनंदित राहील याकरिता महिला आता रस्त्यावर उतरल्या आहेत. याकरिता आंदोलपारचा प्रवित्रा घ्यावा लागला तरी चालेल शांततेच्या मार्गाने गावात दारूबंदीचा निर्धार महिलांनी केला याकरिता पोलिसांचे असहकार्य असल्याचे मत यावेळी महिलांनी व्यक्त केले.

Web Title: The women of the village of Belchheed gathered for liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.