महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:42+5:302021-02-09T04:42:42+5:30

शेलुबाजार : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांनी भेट दिली असता यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार ...

Women need to be empowered through self-help groups | महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम होणे गरजेचे

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम होणे गरजेचे

शेलुबाजार : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांनी भेट दिली असता यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगलाताई सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य सुनीता पांडुरंग कोठाळे, नंदाताई डोफेकर, ग्रामपंचायत सचिव सीमा सुर्वे, प्रशासक ठाकुर, माविम जिल्हा संघटक नागपुरे, जिल्हा माहिती अधिकारी बचत गटाच्या तेजस्विनी काळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. यावेळी ठाकरे म्हणाल्या, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ विविध योजनेतून उपक्रम राबवित असून, या उपक्रमात महिलांनी सहभागी होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे संचालन सीमा सुर्वे यांनी केले. पांडुरंग कोठाळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महिला उपस्थित होत्या.

Web Title: Women need to be empowered through self-help groups