शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

संसाराचा गाडा हाकण्यासाठी विमलबाई बनली धुरकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:22 IST

राजुरा (वाशिम) : तुटपुंज्या पाण्याच्या भरवशावर बिजांकुरलेलं कपाशीच पिक वाचविण्यासाठी पतीच्या खांंद्याला खांदा लावुन शेतातील डवरणीच्या कामात विमलबाई धुरकरी बनली आहे.

- यशवंत हिवराळेराजुरा (वाशिम) : तुटपुंज्या पाण्याच्या भरवशावर बिजांकुरलेलं कपाशीच पिक वाचविण्यासाठी पतीच्या खांंद्याला खांदा लावुन शेतातील डवरणीच्या कामात विमलबाई धुरकरी बनली आहे. मोठ्या धैर्याने संसाराचा गाडा हाकणाºया विमलबाई रवाळे या रिधोरा येथील असून, इतर महिलांसाठी त्या एक आदर्श ठरत आहे.राजुरा पासुन जवळच असलेल्या रिधोरा येथील गुलाब किसन रवाळे या कुटूंबाकडे अकोला - हैद्राबाद महामार्गालगत दोन एकर शेतजमीन आहे.  गत आठवडाभरापुर्वी त्यांनी या शेतजमिनीत कपाशीची लागवड केली. सद्यस्थितीत पीक चांगल्या प्रकारे बिजांकुरले असुन डवरणीला आले आहे. अशा अवस्थेत स्वत:कडे बैलजोडी नाही. औतफाटे नाहीत, शिवाय भाडेतत्वावर कुणाकडून डवरणी करायची तर गाठीशी पैसा नाही. या विवंचनेत अडकलेल्या गुलाब रवाळे यांच्या साथीला अर्धांगीणी विमुलबाई धावुन आली. तुम्ही फक्त डवरे धरा. मी कमरेला दोर बांधुन ओढण्याचे काम करतो असा सल्ला देताच पती गुलाब रवाळेंनी ही होकार देत पत्नीचा सल्ला ग्राह्य मानला. ३० जुन रोजी सकाळी शेतात दाखल होवुन सायकलच्या एका चाकावर बनविलेल्या डवºयाला दोर बांधुन प्रत्यक्ष डवरणीच्या कामाला सुरुवात केली. यातुन इतरांना डवरणीसाठी करावी लागणारी खुशामत व वाचलेला पैसा याचे मनस्वी समाधान रवाळे दाम्पत्याच्या चेहºयावर दिसुन आले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी