लोकशाही दिनातून ‘महिला’च गायब
By Admin | Updated: May 7, 2015 01:07 IST2015-05-07T01:07:45+5:302015-05-07T01:07:45+5:30
तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाची व्यथा ; वाशिम जिल्ह्यात दोन वर्षात केवळ एक तक्रार.

लोकशाही दिनातून ‘महिला’च गायब
मंगरुळपीर : पीडित महिलांना तत्काळ न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ असणार्या तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचा वाशिम जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला आहे. जनजागृती नसल्याने लोकशाही दिनातून ह्यमहिलाह्णच गायब झाल्या आहेत. गत दोन वर्षात कारंजा, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात केवळ एक तक्रार दाखल झाली आहे.
पीडित महिलांना गार्हाणी, तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने मार्च २0१३ पासून प्रत्येक महिन्याच्या चवथ्या सोमवारी तालुकास् तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करणे बंधनकारक आहे. पिडीत महिलांच्या तक्रारींचा ह्यऑन दी स्पॉटह्ण निपटारा करण्यासाठी हा उपक्रम नियमित राबविण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. सोबतच तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनादेखील तहसीलदार आणि महिला व बालविकास विभागाच्या तालुकास्तरीय अधिकार्यांना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने तालुकास्तरावरून महिला लोकशाही दिनाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व प्रसिद्धी होणे आवश्यक होते. मात्र, या उपक्रमाची माहिती गावपातळीपर्यंत पोचली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मंगरुळ पीर तालुकास्तरील महिला लोकशाही दिनात मार्च २0१३ ते मार्च २0१५ या कालावधीत एक तक्रार दाखल झाली होती. सदर तक्रार पुढील कार्यवाहीसाठी विभागीय उपायुक्ताकडे रवाना करण्यात आली आहे. अद्यापही यावर काहीच निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. कारंजा व मानोरा तालुकास्तरीय लोकशाही दिनात ग त दोन वर्षात एकाही महिलेने हजेरी लावली नाही.