शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी शेंदोण्यातील महिलांनी कसली कंबर

By admin | Updated: October 19, 2014 00:26 IST

अवैध दारू केली पोलिसांच्या स्वाधीन.

मानोरा(वाशिम): तालुक्यातील मौजे शेंदोणा येथील महिला मंडळाने गावात होणारी दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली असून, याच प्रयत्नांतर्गत त्यांनी दारूची अवैध विक्री करणार्‍या व्यक्तीला रंगेहाथ पकडून त्याच्याकडील दारू पोलिसांच्या हवाली करीत त्या व्यक्तिविरूद्ध कार्यवाहीची एकमुखी मागणी केली. गावात दारूबंदी असताना १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास एमएच ३७ जी-२३0५ या क्रमांकाच्या ऑटोरिक्षात अवैध देशी दारू आणून खुलेआम दारू विक्री करीत असल्याचे महिला मंडळाच्या निदर्शनास आले. महिला मंडळाच्या काही सदस्यांनी महिनाभरापूर्वीही सदर व्यक्तीला दारूविक्री थांबविण्याची विनंती केली होती. तरीही तो दिवसाढवळ्या देशी दरू विक्री करीत असल्याचे दिसल्याने पोलिस पाटलासमोर पंचमंडळी जमा करून या व्यक्तीकडील दारू ताब्यात घेतली. ही अवैध दारू मानोरा पोलीस स्टेशनमध्ये आणून सदर व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन ठाणेदारांना महिला मंडळाकडून देण्यात आले.