महिलांनी भरविला बैलपोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:23 IST2017-08-21T23:23:23+5:302017-08-21T23:23:23+5:30

women bullock pola celebrated | महिलांनी भरविला बैलपोळा!

महिलांनी भरविला बैलपोळा!

शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील महिलांनी महिला सरपंचांच्या पुढाकारात बैलपोळा भरवून खºया अर्थान महिला सक्षमीकरणाचा परिचय दिला.
ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनिता दत्तात्रय मिटकरी यांच्या मार्गदर्शनात यापूर्वीदेखील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला होता तसेच गावातील अतिक्रमण हटविण्यात मोलाची भूमिका साकारली होती. पुरूषप्रधान सण म्हणून ओळख असलेला बैलपोळा हा ढोरखेडा येथील महिला गतवर्षीपासून स्वत:च भरवित आहेत. यावर्षीदेखील महिलांनी बैलपोळा भरवून परंपरा कायम ठेवली आहे. सरपंच सुनिता मिटकरी, इंदु सावले, कांता जुंगाडे, नंदा गावंडे, अलका पवार, शोभा सावले, कन्याकुमारी मिटकरी यांच्यासह अन्य महिलांनी हा पोळा भरविला. सदर महिलांनी बैलाचा कासरा स्वत:च्या हाती ठेवून सणाचा परंपरागत विधी पूर्ण केला.

 

Web Title: women bullock pola celebrated