वाल्मीकीनगर येथे महिला, पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:35+5:302021-07-30T04:43:35+5:30
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करीत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल ...

वाल्मीकीनगर येथे महिला, पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करीत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळवाटप केले, तसेच गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शिवसेना शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेना शहर प्रमुख गजानन ठेंगडे, ज्योती खोडे, सुनीता गव्हाणकर, शिवानी चौधरी, राधिका इंगळे, बालाजी वानखेडे, नीलेश पेंढारकर, रामचंद्र वानखडे, अशोक शिराळ, अजय सुरुशे, रवी देशमुख, सतीश खंडारे, समिर कुरेशी, राजू धोंगडे, अकिल तेली, चेतन इंगोले, नारायण शं. ठेंगडे, हाजी बागवान, जाकीर बागवान तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते. (वा.प्र.)