महिलेची फसवणूक, दोन अटकेत

By Admin | Updated: September 5, 2014 23:55 IST2014-09-05T00:18:44+5:302014-09-05T23:55:31+5:30

चांदीचे दागिने उजळवून देण्याचे आमिष दाखुन मातोळा तालुक्यातील महिलेची फसवणुक.

Woman's cheating, two arrests | महिलेची फसवणूक, दोन अटकेत

महिलेची फसवणूक, दोन अटकेत

मोताळा: चांदीचे दागीने चमकावून व पॉलीश करून देतो असे सांगुन सहस्त्रमुळी येथील एका महिलेची बिहार राज्यातल्या दोन आरोपींनी फसवणुक केली. ही घटना ३ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
सहस्त्रमुळी येथील गंगुबाई महादेव आयनर वय ४५ हय़ा महिलेस रोशनकुमार ङ्म्रीसदानंद साह वय २0 व रोहितकुमार चतुर दास वय १९ दोघेही रा. पंचगच्छीया बाजार, नवगच्छीया, पोस्टे गोपालपूर जिल्हा भागलपूर राज्य बिहार हे भेटले व विश्‍वासात घेवून चांदीचे दागीने चमकावून व पॉलीश करून देतो असे सांगितले. सदर महिनलेने आपल्याजवळील साडेतेरा हजार रूपये किमतीचे ३0 तोळे चांदीचे बाजुबंद या दोन्ही आरोपींकडे दिले असता, त्यांनी चमकावून देतो असे सांगत त्यातील ४0 ग्राम चांदी काढून महिलेची १८00 रूपयाने फसवणुक केली. गंगुबाई आयनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध कलम ४0६, ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास दुय्यम ठाणेदार शेवाळे करीत आहे. या प्रकरणामुळे गावातील गृहीनीवर्गांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Woman's cheating, two arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.