वीज पडून कळंबा येथील महिला जखमी

By Admin | Updated: June 4, 2017 05:28 IST2017-06-04T05:28:51+5:302017-06-04T05:28:51+5:30

मानोली येथे म्हैस दगावली : वादळी वाºयाने झाडे जमीनदोस्त

Woman injured in Kalambala | वीज पडून कळंबा येथील महिला जखमी

वीज पडून कळंबा येथील महिला जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : शहरासह तालुक्यात २ जून रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून कळंबा बोडखे येथील महिला जखमी झाली. तसेच मानोली येथे वीज पडून म्हशीचा मृत्यू झाला. शहापूर येथे झाडांवर वीज पडल्याने झाडे जमीनदोस्त झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, की कळंबा येथे २ जून रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी ज्योत्स्ना चव्हाण नामक महिला गावालगत पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता, तिच्या बाजूनेच वीज पडली. यात ती जखमी झाली असून, तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सदर महिलेला मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणून, नंतर वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानोली येथे उत्तम अभिमान सुर्वे यांच्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. यामध्ये सुर्वे यांचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाने वरिष्ठांकडे सादर केला आहे. तसेच शहापूर आणि दाभा येथे झाडांवर वीज पडली; तर वसंतवाडी येथे पावसादरम्यान विजेचा शॉक लागून गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Web Title: Woman injured in Kalambala