धारपिंप्री येथे विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:02 IST2017-10-07T02:02:04+5:302017-10-07T02:02:56+5:30

मालेगाव: तालुक्यातील धारपिंप्री येथील महिलेचा शेतातील  विहिरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ६  ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली.

The woman dies after drowning in the well. | धारपिंप्री येथे विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू!

धारपिंप्री येथे विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू!

ठळक मुद्देशेतातील  विहिरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यूधारपिंप्री येथील घटना


लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: तालुक्यातील धारपिंप्री येथील महिलेचा शेतातील  विहिरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ६  ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. याबाबत प्रभाकर दत्तराव चव्हाण यांनी मालेगाव पोलिसांत  फिर्याद दिली, की सविता शिवाजी चव्हाण (वय २५ वर्षे) ही  महिला शेतामध्ये विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता तिचा  पाय घसरून ती आतमध्ये पडली. यादरम्यान पाण्यात बुडून तिचा  मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जयकांत  राठोड करीत आहेत. 

Web Title: The woman dies after drowning in the well.