लस घेतलेले प्रमाणपत्राविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:13+5:302021-09-10T04:49:13+5:30
प्रमाणपत्र आरोग्य विभाग ग्रामपंचायतकडे असल्याचे तर ग्रामपंचायत आमच्याकडे जबाबदारी नसल्याचे सांगताहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लस प्रमाणपत्रासाठी कोणाकडे चौकशी ...

लस घेतलेले प्रमाणपत्राविना
प्रमाणपत्र आरोग्य विभाग ग्रामपंचायतकडे असल्याचे तर ग्रामपंचायत आमच्याकडे जबाबदारी नसल्याचे सांगताहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लस प्रमाणपत्रासाठी कोणाकडे चौकशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही नागरिकांचे प्रमाणपत्र देण्यात आले, त्यावर लस घेतलेल्या तारखेत मोठी तफावत दिसून येते, त्यामुळे दुसरा डोस घेण्याकरिता अडचण जात आहे. कोंडोली येथे लसीकरण शिबिर थांबविण्यात आले होते, त्यावेळी मानोरा तहसीलचे नायब तहसीलदार संदेश किर्दक यांनी मध्यस्थी केली होती , तरीही गावकऱ्यांना लस प्रमाणपत्र मिळाले नाही. रेल्वे प्रवास, विद्यार्थिनी, स्वस्त धान्य खरेदी करताना, शेतक-यांना बँकेत, अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी लस प्रमाणपत्र मागण्यात येते, त्यावेळी मात्र अडचण निर्माण होत आहे. म्हणून लस घेणाऱ्यांना प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी होत आहे.