१५ दिवसात ‘व्यापारी गाळे’ खाली करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:52 IST2017-07-31T19:39:59+5:302017-08-01T01:52:38+5:30
मंगरुळपीर (वाशिम): शहरातील मध्यवर्ती भागातील नगर पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील करार संपलेली ४७ दुकाने (गाळे) १५ दिवसांत थकीत भाड्यासह खाली करावी, अशा आशयाची नोटीस मूळ लिलावधारकांना नगर परिषदेच्यावतीने बजावण्यात आली आहे.

१५ दिवसात ‘व्यापारी गाळे’ खाली करा !
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): शहरातील मध्यवर्ती भागातील नगर पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील करार संपलेली ४७ दुकाने (गाळे) १५ दिवसांत थकीत भाड्यासह खाली करावी, अशा आशयाची नोटीस मूळ लिलावधारकांना नगर परिषदेच्यावतीने बजावण्यात आली आहे. या नोटीसमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
मंगरूळपीर नगर पालिकेची शहरात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहे. उत्पन्नाकरिता पालिकेने या मालमत्ता भाडेपट्ट्यावर दिल्या आहेत. याकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येते. यापैकी शहरातील मध्यवर्ती भगाात असलेल्या मुख्य बाजारपेठेत ४७ दुकानांची चाळ आहे. सदर दुकाने लिलावाव्दारे घेतली होती. कारारनामानुसार याची मुदत संपलेली आहे. मुदत वाढवून त्याच भाडेकरुंना पुन्हा देण्यात आली. त्यानंतरसुध्दा करार संपला म्हणून रितसरपणे गाळेधारकांना ७ डिसेंबर व १२ डिसेंबर २०१३ व ३१ मार्च २०१५ रोजी दुकान (गाळे) खाली करुन थकीत भाड्यासह पालिकेकडे जमा करावे, अशी सूचना नोटीसद्वारे दिली होती. परंतु गाळेधारकांनी अद्यापही दुकाने खाली केली नाहीत. यामधील काही गाळेधारकांनी हजारो रुपये घेवुन पोटभाडेकरु किंवा परस्पर व्यवहार करुन नोंदी करुन घेतल्याची व्यापरी वर्तुळात चर्चा आहे.