वाशिम जिल्हा परिषदेच्या पदभरतीत गोंधळ
By Admin | Updated: November 19, 2014 02:28 IST2014-11-19T02:28:36+5:302014-11-19T02:28:36+5:30
नातेवाइकांचीच निवड : लाखोची उलाढाल

वाशिम जिल्हा परिषदेच्या पदभरतीत गोंधळ
वाशिम : जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या रिक्तपदी गेल्या आठवडाभरापासून पदभरती परीक्षा घेण्यात येत आहेत. या पदभरतीमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या चर्चेला चांगलेच उधान आले आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदासाठी गेल्या आठवडाभरापासून लेखी परीक्षा सुरू आहेत. निवड समितीमधील अधिकार्यांच्या नातेवाइकांचीच यामध्ये निवड झाल्याचा आरोप रवींद्र प्रकाश बन्सोड यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे लेखी स्वरूपात केला आहे. लघू सिंचन विभागातील अधिकारी निवड समितीमध्ये आहेत. त्यांचा नातेवाईक असलेल्या उमेदवाराची निवड झाल्यामुळे बन्सोड यांनी पदभरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. ९ नोव्हेंबर रोजी औषध निर्माता या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती; मात्र या परीक्षेचा निकाल रोखून ठेवला आहे. यामुळे जि.प. पदभरतीत नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असल्याची बाब अधोरेखीत होत आहे.