शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

जानेवारीमध्ये होणार वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 9:50 PM

जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे५ ते ७ जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजनउपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा -२०१७-१८ चे आयोजन ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिने विविध समित्या गठीत केल्या असून, आता पूर्वनियोजनला सुरूवात करण्यात आली.शासकीय कामकाज पार पाडत असतानाच, अधिकारी व कर्मचा-यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सादरीकरणासाठी व्यासपिठ उपलब्ध व्हावे, थोडाफार विरंगूळा मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २०१८ या दरम्यान अधिकारी व कर्मचा-यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित केल्या आहेत.  या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील तर सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद कापडे यांची एकमुखाने निवड करण्यात आल्यानंतर विविध समित्या कठीत करण्यात आल्या. तालुकास्तरावरदेखील गटविकास अधिका-यांकडे समिती अध्यक्षाची जबाबदारी सोपवून सचिव पदी गटशिक्षणाधिका-यांची निवड करण्यात आली.  तालुकास्तरावर १६ डिसेंबरपूर्वी दरवर्षीप्रमाणे सर्व खेळाडूंची आवश्यकतेनुसार चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य खेळाडूंची निवड करावयाची आहे. निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी २२ डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्हा परिषदेकडे सादर करावयाची आहे. खेळप्रकारनिहाय खेळाडूंची यादी प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर नियोजन केले जाणार आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतून यशस्वी ठरलेल्या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी होणार आहे. अद्याप विभागीय स्पर्धेची तारीख निश्चित झाली नसून, लवकरच विभागीय आयुक्त ही तारीख जाहिर करतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषद कर्मचारी संघटना बाळगून आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाºयांना योग्य त्या सूचना दिल्या. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSportsक्रीडा