मतांच्या टक्केवारीवर विजयाची मदार
By Admin | Updated: October 17, 2014 00:45 IST2014-10-17T00:45:35+5:302014-10-17T00:45:35+5:30
वाशिम जिल्ह्यात ६१.0३ टक्के मतदान.

मतांच्या टक्केवारीवर विजयाची मदार
वाशिम : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये १५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. जिल्ह्यात ६१.0३ टक्के मतदान झाले असून, या टक्केवारीवर कोणाचा विजय होवू शकतो, यासाठी राजकीय मंडळी गणिते मांडताना आता राजकीय विश्लेषक दिसून येत आहेत.
जिल्ह्यात केवळ तीनच विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत मतदान झाल्यानंतरही चित्र स्पष्ट होत नसल्याने राजकीय मंडळी आता गावनिहाय मतदानाची आकडेवारीचा अभ्यास करीत कोणते गाव कोणाचे, कोण्या जातीचे, कोण्या पक्षाचे येथे जास्त मतदान आहे, याचा विचार करून आखाडे बांधताना दिसून येत आहेत. वाशिम विधानसभा म तदारसंघामध्ये अतिशय अटीतटीच्या निवडणुकीचा अंदाज आहे. यामध्ये कोणाचा विजय निश्चित होऊ शकतो, हे सांगताना खुद्द राजकारण्यांनासुद्धा कठीण जात आहे. तेथे सामान्य जनतेचा तर विषयच वेगळा आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये कोण निवडून येईल, याबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत. मात्र, नेमका विजय कोणाचा, हे आताच सांगता येत नसल्याचे राजकीय मंडळी बोलताना दिसून येत आहेत.