शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्येही वाशिम जिल्ह्यातील शाळा राहणार ‘लॉक’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:36 IST

Educaiton Sector News : अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे अनलॉकमध्येही शाळा लॉक राहणार की अनलॉक होणार याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षादेखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावी व बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने शाळा सुरू होणार? की नाही, याकडे पालकांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत जवळपास १३६४ शाळा आहेत. ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा ग्रामपंचायतींनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू करावयाच्या झाल्यास शाळांचे निर्जंतुकीकरण, साफसफाई व अन्य कामे आतापासूनच करावी लागणार आहेत. विदर्भात शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजते. शाळा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून अद्याप शिक्षण विभागाला सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे शाळा केव्हा सुरू होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांचे लक्ष लागून आहे.

शाळा सुरू करायची म्हटली तर...मे महिन्यात ग्रामीण भागात अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्यात आल्या. २६ जूनपासून शाळा सुरू करावयाचे आदेश आल्यास, शाळांचे निर्जंतुकीकरण, साफसफाईसाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागू शकतो. शाळेची डागडूजी, निर्जंतुकीकरण, साफसफाई व अन्य सुविधा यासाठी १० ते २० हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. यासाठी निधी कोण पुरविणार? हा प्रश्न अनुत्तरीय आहे.

गुरूजींची शाळा       सुरू होणारnगतवर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असल्या तरी   प्रशासकीय कामासाठी शाळा सुरू होत्या. यंदादेखील २६ जूनपासून वरिष्ठांच्या सुचनेनुसार कोरोना लसीकरण, शिक्षण विभागाचे प्रशासकीय कामकाज व अन्य कामकाजासाठी शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

विदर्भातील शाळा दरवर्षी २६ जूनपासून उघडण्यात येतात.  गतवर्षीदेखील कोरोनामुळे २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या नव्हत्या. शाळा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून अद्याप सूचना प्राप्त झाल्या नाहीत. प्रशासकीय कामासाठी शिक्षकांना बोलाविले जाऊ शकते. वरिष्ठांच्या सुचनेनुसार शाळांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल.-  गजानन डाबेराव,उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळा