मुकाबलामधील अश्लीलता खपवून घेणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:32 IST2021-02-19T04:32:09+5:302021-02-19T04:32:09+5:30

हळदा तांड्यात मुकाबला आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी संजय महाराज पोहरादेवी, नामा बंजारा नागपूर, शेतकरी नेते मनोहर राठोड, ...

Will not tolerate obscenity in combat! | मुकाबलामधील अश्लीलता खपवून घेणार नाही!

मुकाबलामधील अश्लीलता खपवून घेणार नाही!

हळदा तांड्यात मुकाबला आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी संजय महाराज पोहरादेवी, नामा बंजारा नागपूर, शेतकरी नेते मनोहर राठोड, गोर सेना प्रमुख गोपाल राठोड, जगदीश जाधव मानोरा यांनी हळदा येथे जाऊन पो. पा. राठोड सर यांची भेट घेतली व मुकाबलामधील अश्लीलतेचा उच्चांक त्यांच्या नजरेस आणून दिला. अश्लीलतेचा कोणताही प्रकार मी माझ्या तांड्यात घडू देणार नाही! असे अभिवचन देत त्यांनी या सर्व लोकांचे सत्कार केले. गोर बंजारा समाजातील चालीरीती, हुंडा, अशा वाईट बाबींवर आलेल्या भजनकरीनी प्रबोधन करावे, अश्लीलतेचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही! असा इशारा या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनातून दिला. पोहरादेवीच्या आम्हा महाराजांची नजर या मुकाबला प्रकारावर असून त्यासाठी तरुणांची फौज तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणी ऐकत नसेल तर नाइलाजाने आयोजकांवर बहिष्कार घालण्यासारखे पर्याय समाजाने खुले ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले. याप्रसंगी श्याम राठोड, जय पवार, विशाल राठोड, प्रदीप राठोड, नितीन राठोड उपस्थित होते.

Web Title: Will not tolerate obscenity in combat!