Will not let the trust of the people be shattered- Thackeray | जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- ठाकरे

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- ठाकरे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष आर.के. राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विद्या सुभाष कावरे, उपसरपंच दुर्गा चौधरी, माजी पं.स. सभापती भास्कर पाटील, रवी पाटील, डॉ. भगवान भेंडेकर, माजी सरपंच बंडू ठाकरे, सुभाष कावरे, माजी सरपंच विष्णू फड, भगवान खोटे, सूर्यभान चौधरी, अशोक वाघमारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आसेगाव भागातील शेतकऱ्यांचा सिंचन प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आसेगाव, सनगाव, नांदगाव, चिंचोली, पिंपळगाव, कुंभी लही, वसंतवाडी, शिवनी, दाभडी, भड कुंभा या गावात विकासकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंभीचे माजी सरपंच सुभाष कावरे, पिंटू ईल्हे, भगवान खोट, सूर्यभान चौधरी, बालाजी खोटे, केशव चौधरी, देविदास चौधरी यांनी सहकार्य केले. संचालन देविदास चौधरी यांनी केले. (वा.प्र.)

Web Title: Will not let the trust of the people be shattered- Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.