शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुडगुुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST2021-07-09T04:26:43+5:302021-07-09T04:26:43+5:30

कामरगाव : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर असतांना कामरगाव व विळेगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुडगुस घालून पेरलेले बियाणे फस्त ...

Wildlife hunting in the fields | शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुडगुुस

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुडगुुस

कामरगाव : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर असतांना कामरगाव व विळेगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुडगुस घालून पेरलेले बियाणे फस्त केल्याने या शेतशिवारातील शेतकऱ्यावर दुबारपेरणीचे संकट ओढाविले आहे.

पहिल्यांदा पेरणी करतानाच बियाणे व खतांची जुळवाजुळव करतांना शेतकऱ्याच्या नाकीनऊ आले हेाते. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रात ८ जूनला कारंजा तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने व त्यापुढे काही दिवस तालुक्यात पाऊस कायम राहिल्याने जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या ईशाऱ्यावर विसंबून राहून पेरणी केली नाही. त्यानंतर काहीकाळ पावसाने दडी मारल्यानंतर सदर परिसरात मागील आठवड्याभऱ्यापूर्वी पाऊस झाल्याने पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. परंतु पेरणी झाल्यानंतर सदर परिसरातील बहुतांश शेतात रानडुक्करांनी हैदोस घालून पेरलेले सोयाबीन व तुरीचे बियाणे जमिनीतून उखरून फस्त केले. त्यामुळे या शिवारातील शेतकरी हवालदिल झाले आहे. कामरगाव येथील शेतकरी किसनराव निकम यांनीसुद्धा आपले विळेगाव शेतशिवारातील सर्वे नं. ५९ मध्ये सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी केली होती; परंतु रानडुक्करांनी पेरलेले संपूर्ण बियाणे उखरून खाल्ल्याने निकम यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची व वन्यप्राण्यांचा ंबंदोबस्त करण्याची मागणी केल्या जात आहे.

Web Title: Wildlife hunting in the fields