छेडछाड करून महिलेची दुचाकी जाळली!

By Admin | Updated: May 10, 2017 07:09 IST2017-05-10T07:09:06+5:302017-05-10T07:09:06+5:30

महिलेची छेडछाड करून तीची दुचाकी जाळून दिल्याप्रकरणी सात आरोपींविरूद्ध मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले.

Wife of a woman was burnt by teasing! | छेडछाड करून महिलेची दुचाकी जाळली!

छेडछाड करून महिलेची दुचाकी जाळली!

मंगरूळपीर : येथे एका महिलेची छेडछाड करून तीची दुचाकी जाळून दिल्याप्रकरणी सात आरोपींविरूद्ध मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले आहे, की आरोपी रोशन चव्हाण, अमीन चव्हाण, वृषभ चव्हाण, संकेत चव्हाण, अनिकेत चव्हाण, उल्हास पडघान, शुभम भेंडेकर यांनी ८ मे च्या मध्यरात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी जाळून टाकली. एवढेच नव्हे; तर अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी देखील नमूद आरोपींनी आपणास त्रास दिला असून त्याची लेखी तक्रारही मंगरूळपीर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद सात आरोपींविरूद्ध कलम १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ३५४-अ, ३५४-ड, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Wife of a woman was burnt by teasing!