वाशिम  जिल्ह्यातील होम क्वाॅरंटीन २२२ जणांवर वाॅच कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:58 AM2020-12-18T11:58:10+5:302020-12-18T11:58:19+5:30

Home Quarantine या रुग्णांवर वाॅच कोणाचा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Whose watch on 222 Home Quarantine in Washim District? | वाशिम  जिल्ह्यातील होम क्वाॅरंटीन २२२ जणांवर वाॅच कोणाचा?

वाशिम  जिल्ह्यातील होम क्वाॅरंटीन २२२ जणांवर वाॅच कोणाचा?

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यात सध्या २२२ कोरोना रुग्णांनी  ‘होम  क्वाॅरंटीन’चा  (गृह विलगीकरण) पर्याय स्वीकारलेला असून, या रुग्णांवर वाॅच कोणाचा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. सरकारी रुग्णालयांसह खासगी कोविड हाॅस्पिटलमध्येदेखील कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वाॅरण्टाइनचा पर्याय जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिला होता. घरी शाैचालय, स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था तसेच डाॅक्टरांची सेवा सहज उपलब्ध करू शकणाऱ्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात राहता येते. सुरुवातीला गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर स्थानिक प्रशासन व स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वाॅच ठेवला जात होता. आता पूर्वीसारखा वाॅच नसल्याचे दिसून येते.

जिल्हयात कोरोनाची साैम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. स्वतंत्र शाैचालय व स्वच्छतागृह तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करू शकणाऱ्यांना हा पर्याय स्विकारता येतो. आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी पाहणी केली जाते.    

- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी 

Web Title: Whose watch on 222 Home Quarantine in Washim District?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.