त्यांच्या मैत्रीला खरचं कुणाची दृष्ट लागली का ?

By Admin | Updated: August 5, 2014 20:35 IST2014-08-05T00:31:42+5:302014-08-05T20:35:45+5:30

३ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या मैत्रीचा अखेरचा दिवस ठरला.

Who really saw their friendship? | त्यांच्या मैत्रीला खरचं कुणाची दृष्ट लागली का ?

त्यांच्या मैत्रीला खरचं कुणाची दृष्ट लागली का ?

रिसोड: 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा' हे कधी कुणी सांगू शकेला काय. तसचं मैत्रीचं आहे. आपल्या मैत्रीचा धागा अजून घट्ट करण्यासाठी मैत्रीदिनाच्या दिवशी एकमेकींना शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांच्या मैत्रीला कुणाची दृष्ट लागली देव जाणो. ३ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या मैत्रीचा अखेरचा दिवस ठरला. मन सुन्न करणार्‍या या घटनेने आजही रिसोड शहर शोककळेत चिंब डूबून गेले आहे.
रिसोड शहरातील शिवाणी गजानन साळेगावकर, प्रज्ञा विलास मोरे , ऐश्‍वर्या गणेश गवळी तिन्ही जिवलग मैत्रीण भारत माध्यमिक शाळेत इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होत्या. मनमिळाऊ, धाडसी, हुशार, विद्यार्थीनी म्हणून त्यांचे सर्वत्र नावलौकीक होते. तीन्ही मैत्रीणींनी फ्रेडशीप डे चे औचित्य साधून रविवारला ऐश्‍वर्याच्या शेतात जावून पोहणे शिकण्याचे नियोजन केले होते. त्या अनुषंगाने प्रज्ञा मोरे हीने सोबत बॅग सुध्दा घेतली होती. त्यामध्ये पोहणे शिकण्यकारिता अतिरिक्त कपडे सुध्दा आणले होते. ऐश्‍वर्या गवळी यांच्या फॉर्म हाऊसवरील शेतात प्रज्ञा व शिवाणी सकाळी साडे अकराच्या दरम्यान नियोजित वेळेनूसार पोहचल्या तीन्ही मैत्रीनी एकत्र जमल्यानंतर तिघींचा संयुक्त निर्णय घेवून ऐश्‍वर्या ही तिच्या वडिलाकडे फार्म हाऊस समोरील शेततळयात पोहण्याची परवानगी घेण्यासाठी गेली. ऐश्‍वर्याने वडिलांच्या कानावर सदर बाब टाकताच तिच्या वडीलांनी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. पोहण्याचा हट्ट धरु नकोस असा सूचक उपदेश ऐश्‍वर्याचे वडिल यांनी तिघी मैत्रीणींना दिला. या उपरांत एश्‍वर्याच्या आईने तिघींसाठी पोहयांचा फराळ केला. तिघी मैत्रीणींनी फराळ केल्या नंतर संपूर्ण शेताला व शेततळयाच्या सभोवताल फेरफटका मारला . पोहण्याची तीव्र इच्छा मनात असलेल्या तिघींना पुन्हा एकदा ऐश्‍वर्याच्या वडिलाकडे पोहण्याची परवानगी मिळावी या उद्देशाने घेवून गेली. असे एक वेळा नव्हे तर या तिघी मैत्रीणी तब्बल चार वेळा गणेश गवळी यांच्याकडे पोहण्याची परवानगी मागण्यास गेल्या होत्या. मैत्रीणींच्या वडिलांनी चार वेळा स्पष्ट शब्दात नकार दिलेला असतांनाही या तिघी मैत्रीणींना पोहणे शिकण्याची अंतर मनातील इच्छा रोखता आली नाही. तिन्ही मैत्रीणी पोहण्यात तरबेज नसल्याने पाण्यात डुबून एकमेकींना वाचविण्यात त्यांना दुदैवी अंत झाला. घटनेची वार्ता शहरात पसरताच सर्वत्र स्मशान शांतता पसरली. कुटूंबातील सदस्याचे दु:ख पाहुन हृदयाचे पाणी पाणी होत होते. जणू अभाळच कोसळल्याचे जाणवत होते. कुटूंबातील शोक मग्न सदस्यांना सात्वनपर धीर देणे सुध्दा उपस्थितांना कठीण जात होते. मृद स्वभावी, मितभाषी, हुशार विद्यार्थीनींचा असा दुर्देवी अंत पाहूण उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
दरम्यान रविवारला रात्री ऐश्‍वर्या गणेश गवळी, हिचेवर तिच्या फॉर्महाऊस च्या शिवारात तर शिवाणी गजानन साळेगावकर हिचेवर वाणी स्मशान भूमीमध्ये , प्रज्ञात विलास मोरे हिच्यावर दलित स्मशानभूमीमध्ये अंतीम संस्कार करण्यात आला. यावेळी तिन्ही मैत्रीणींच्या अंत्यविधी करिता हजारोंच्या जनसमुदाय एकवटला होता.
या तिन मैत्रिणींचा मृत्यू झाल्याची घटना कानावर येताच प्रत्येकांना ह्यमरते दम तकह्ण या चित्रपटातील ह्यछोडेंगे ना हम तेरा साथ हो साथी मरते दम तरह्ण या गिताच्या ओळी आपुसकच आठवल्याने भावूक झालेल्या शहरवासीयांनी आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली.

Web Title: Who really saw their friendship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.