पांढर्या माशीचे नियंत्रणच उपाय
By Admin | Updated: September 10, 2014 00:44 IST2014-09-10T00:44:42+5:302014-09-10T00:44:42+5:30
सोयाबीन उत्पादनात घट येण्याची शक्यता : कृषी विभागाच्यावतीने शेतकर्यांचे प्रबोधन

पांढर्या माशीचे नियंत्रणच उपाय
वाशिम:जिल्ह्यातील सोयाबीन या मुख्य पिकावर पिवळ्य़ा मोझ्ॉक या विषानुजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्याच्या नियंत्रणसाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक कृषी संशोधन केंद्रात आयोजित कार्यशाळेत कृषीतज्ज्ञांनी केले.
स्थानिक कृषी संशोधन केंद्रात चर्चासत्र व परिसरातील पिक पाहणी कायक्रमात कृषी विद्यावेत्ता डॉ. भरत गिते, डॉॅ. मुरलीधर इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. सोळंके, डोईफोडे यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व सहाही तालुक्यातील मंडळ कृषी अधिकार्यांची या चर्चासत्राला उपस्थिती होती. या चर्चासत्रात जिल्ह्यातील सोयाबीन या मुख्य पिकावर पिवळ्य़ा मोझ्ॉक या विषानुजन्य रोगाच्या वाढलेल्या प्रसाराबाबत व त्याच्या नियंत्रणाबाबत शेतकर्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत विशेष विचारमंथन करण्यात आले. या चर्चासत्रात जिल्ह्यातील पिकांची स्थिती व त्यांच्या नियोजनाबाबतही विस्तृत चर्चा करण्यात आली.
** काय आहे पिवळा मोझ्ॉक
हा रोग विषाणुमुळे होतो. या रोगामुळे पिकाची पाणी प्रथम पिवळी पडतात. पाणाचा काही भाग पिवळा व काही भाग हिरवा राहतो. पाने फिक्कट होउन त्याचा आकार लहान होतो. शेंड्याकडील पाने आकसल्यासारखी होतात.
** कसा होतो प्रसार व नियंत्रण
पिवळ्य़ा मोझ्ॉकचा प्राथमिक प्रसार बियाण्यांमुळे व दूय्यम प्रसार पांढर्या माशीमुळे होतो. एकदा प्रसार वाढला की तो नियंत्रणातच आणता येत नाही. त्यामुळे पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४0 टक्के प्रवाही २५ मिली किंवा डायमेथोएट ३0 टक्के प्रवाही ३३ मिली किंवा फेनप्रॉप्रेथ्रीन ५0 टक्के प्रवाही १0 मिली किंवा अँसिटामीप्रीड २0 टक्के पा भूकटी १.५ ग्रॅम प्रति १0 लिटर पाण्यात घेवून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.