व्हाईट कोल फॅक्टरीला आग!
By Admin | Updated: April 11, 2017 21:27 IST2017-04-11T21:27:15+5:302017-04-11T21:27:15+5:30
मंगरुळपीर- पांढरा कोळसा बनविण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

व्हाईट कोल फॅक्टरीला आग!
सहा लाखांचे नुकसान : शॉर्ट सर्किटमुळे घडली घटना
मंगरुळपीर : तालुक्यातील आसेगाव येथील पांढरा कोळसा बनविण्याच्या कारखान्याला (व्हाईट कोल फॅक्टरी) शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, आसेगाव येथील वसीम खान नबीऊल्लाह खान ठेकेदार यांच्या पांढरा कोळसा निर्मितीच्या कारखान्याला १० एप्रिल रोजी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. त्यात १ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या तारा, ४५ हजारांचे कॅपेसीटर तसेच १०० टन कोळसा किंमत ४ लाख असा एकंदरित ६ लाख १० हजार रुपये किंमतीचा माल जळून खाक झाला. यादरम्यान मंगरुळपीर येथील अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी आली होती. परंतू आसेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.