...तर २२३ ग्रां. प. चा पाणीपुरवठा होणार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:52+5:302021-04-06T04:40:52+5:30
जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींकडे १.२५ कोटी रुपयांचे विद्यूत देयक थकीत आहे. यासह मालेगाव तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींकडे १.६ कोटी, ...

...तर २२३ ग्रां. प. चा पाणीपुरवठा होणार ठप्प
जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींकडे १.२५ कोटी रुपयांचे विद्यूत देयक थकीत आहे. यासह मालेगाव तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींकडे १.६ कोटी, मंगरूळपीर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींकडे ६१ लाख, मानोरा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींकडे ७० लाख, रिसोड तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींकडे ६५ लाख आणि वाशिम तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनेची १.१७ कोटींची विद्युत देयक थकबाकी आहे. ही रक्कम ३१ मार्चअखेर वसूल होणे आवश्यक होते ; मात्र त्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने नाईलाजास्तव विद्युत पुरवठा खंडित करावा लागणार असल्याचा इशारा महावितरणकडून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे.
..................
बाॅक्स :
४८ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा सुरळीत
जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात आली होती. त्यापैकी ४५ ग्रामपंचायतींनी ‘पार्ट पेमेंट’पोटी १.१८ कोटी रुपयांची रक्कम अदा केली असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
..............
कोट :
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना शासनाकडून १४ व्या वित्त आयोगांतर्गत खर्चासाठी पुरेशा प्रमाणात निधी दिला जातो. त्यातून विद्युत देयक अदा करणे सहजशक्य आहे; मात्र नेमक्या याच महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या २२३ ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांच्या विद्युत देयकांची ५.४४ कोटींची रक्कम थकीत आहे. ती वेळेत न मिळाल्यास नाईलाजास्तव विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.
- पी. के. चव्हाण
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम