वाहतुक नियंत्रणाचा निधी जातो कुठे?

By Admin | Updated: May 26, 2014 00:22 IST2014-05-25T20:58:35+5:302014-05-26T00:22:32+5:30

रिसोड शहरातील वाहतुकीची घडीपार विस्कटली आहे.

Where does traffic control funds go? | वाहतुक नियंत्रणाचा निधी जातो कुठे?

वाहतुक नियंत्रणाचा निधी जातो कुठे?

रिसोड: रिसोड शहरातील वाहतुक व्यवस्था पार विस्कटून गेली आहे. बेशिस्त वाहतुकीला योग्य वळण लावण्यासाठी शासनाकडून प्राप्त होणार्‍या रस्ता अनुदानामधून कमीत कमी दहा टक्के निधी मिळतो, असा शासनाचा नियम सांगतो. मात्र, रिसोड शहरातील बेशिस्त वाहतुकीवर नजर टाकली तर हा निधी नेमका जातो कुठे? हा संशोधनाचा विषय झाला आहे. येथील बसस्थानक व लोणी फाटा परिसर जिल्हाधिकार्‍यांनी ह्यनो पार्किंग झोनह्ण म्हणून घोषित केला आहे. येथे वाहतूक कर्मचार्‍यांची नियुक्तीदेखील आहे. मात्र, तरीदेखील हा परिसर खासगी वाहनांचा ह्यतळह्ण बनल्याने शहरातील वाह तूक व्यवस्था कोलमडून जात आहे. हिंगोली, सेनगाव मार्गाकडे तसेच मेहकर, मालेगाव, साखरामार्गे जिंतूर तसेच वाशिम मार्गावर चालणारी खासगी वाहनात १५ ते २५ प्रवासी अक्षरश: कोंबले जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Where does traffic control funds go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.