शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रेल्वेची मासिक पास कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी निवळले आहे. त्यामुळे यापूर्वीच सुरू झालेल्या रेल्वेचा प्रवास आता पूर्वपदावर आला आहे. ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी निवळले आहे. त्यामुळे यापूर्वीच सुरू झालेल्या रेल्वेचा प्रवास आता पूर्वपदावर आला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. असे असताना मासिक पास सेवा मात्र अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. यामुळे नियमित ये-जा करणाऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही सुविधा नेमकी कधी सुरू होणार, असा सवाल संबंधितांमधून उपस्थित केला जात आहे.

कोरोना काळात वाशिममार्गे धावणाऱ्या सर्वच एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेचा प्रवास बंद करण्यात आला होता. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एक्स्प्रेस आणि पॅसेंजरही पूर्वीप्रमाणे धावायला लागल्या. मात्र, मासिक पास सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. यामुळे विशेषत: वाशिम ते हिंगोली, वाशिम ते अकोला नियमित ये-जा कराव्या लागणाऱ्यांची गैरसोय होत आहे. मासिक पास सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे.

..............

(बॉक्स)

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

वाशिममार्गे सध्या दैनंदिन इंटरसिटी एक्स्प्रेस, डेमू पॅसेंजर यासह नागपूर-कोल्हापूर, नांदेड-अमृतसर, अमरावती-तिरुपती, श्रीगंगानगर-नांदेड यासह इतरही मार्गांवरील एक्स्प्रेस रेल्वेचा प्रवास पूर्ववत झाला आहे. नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती बहुतांश कमी झाल्याने रेल्वेच्या प्रवासी संख्येतही आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

..............

(बॉक्स)

मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?

मुंबईत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना रेल्वे विभागाकडून मासिक पास दिला जात आहे. मात्र, वाशिम रेल्वे स्थानकावर ही सुविधा अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. त्यामुळे मुंबईत सवलत, आम्हाला का नाही, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

..............

भुर्दंड किती दिवस सहन करायचा?

कामानिमित्त नेहमीच अकोला येथे जावे लागते. त्यासाठी रेल्वेचा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा होता. मात्र, कोरोना काळात ही सुविधा ठप्प झाल्याने पर्यायी वाहनांत्रारे प्रवासावर अधिक खर्च झाला. आता हा प्रश्न सुटला; परंतु मासिक पासची सुविधा नसल्याने भुर्दंड किती दिवस सहन करायचा?

- सुनील इढोळे

....................

व्यवसायानिमित्त पूर्वीपासूनच अकोल्यातील व्यापाऱ्यांशी संबंध आहेत. तेथूनच माल आणावा लागतो. प्रवासाकरिता रेल्वेचा पर्याय सोयीस्कर आहे. मात्र, मासिक पास सुविधा अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. यामुळे जेव्हा काम असेल तेव्हा तिकिटाचे पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.

- सचिन खडसे

.......................

वाशिम ते अकोला हे अंतर ८० किलोमीटर आहे. रेल्वेद्वारे ते दीड तासात कापले जाते. यासह वाशिमला राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे अपडाऊन करीत आहे. पूर्वी रेल्वेची मासिक पास काढून कमी पैशांत काम व्हायचे. मात्र, कोरोनानंतर रेल्वेचा प्रवास सुरू होऊनही पासची सुविधा मिळाली नाही.

- गजानन बढे

......................

कोट :

कोरोनाच्या संकटानंतर काही दिवसांपासून रेल्वेचा प्रवास पूर्ववत करण्यात आला. रेल्वेची मासिक पास सुविधाही लवकरच पूर्वीप्रमाणे कार्यान्वित केली जाईल. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता रेल्वे विभागाने पूर्वीपासून ठोस पावले उचललेली आहेत. प्रवाशांनी सहकार्य करावे.

- एम.टी. उजवे, स्टेशन मास्तर, वाशिम