शौचालय असतांना उघडयावर शौच !
By Admin | Updated: October 18, 2016 16:50 IST2016-10-18T16:50:33+5:302016-10-18T16:50:33+5:30
रिसोड नगरपालिकेच्यावतीने उघडयावर शौचास जावू नका याबाबत जनजागृती करीत असतांना ज्यांच्याघरी शौचालय आहे. ते व्यक्ती उघडयावर जात

शौचालय असतांना उघडयावर शौच !
>- निनाद देशमुख/ रिसोड
रिसोड नगरपालिकेच्यावतीने उघडयावर शौचास जावू नका याबाबत जनजागृती करीत असतांना ज्यांच्याघरी शौचालय आहे. ते व्यक्ती उघडयावर जात असल्याचा प्रकार १८ आॅक्टोबर रोजी उघडकीस आला. याबाबत मुख्याधिकारी पानझाडे यांनी उघडयावर शौचास जाणा-यांना चांगलीच समज दिली.
रिसोड नगरपालिकेच्यावतीने दररोज सकाळी शौचालय बांधण्याबाबत जनजागृतीसाठी गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित आहे. १८ आॅक्टोबर रोजी सकाळी पथक शहरात फिरले असता अनेक उघडयावर शौचास जाणा-यांना उघडयावरील शौचालयामुळे होणा-या परिणामाची जाण करुन दिली. यावेळी काही महिलांचे नावे विचारले असता त्यांच्या घरी शौचालय देवून सुध्दा ते उघडयावर जातांना आढळून आल्यात.