पीक नुकसानभरपाई मिळणार केव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:56+5:302021-09-24T04:48:56+5:30

---- शेकडो हेक्टरवर फळबाग लागवड वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ४३ गावांत शेतकऱ्यांनी शेकडो ...

When to get crop compensation | पीक नुकसानभरपाई मिळणार केव्हा

पीक नुकसानभरपाई मिळणार केव्हा

----

शेकडो हेक्टरवर फळबाग लागवड

वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ४३ गावांत शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर सीताफळ व निंबू लागवड केली. सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून देण्यात आली.

----------

रस्त्याच्या डागडुजीची मागणी

वाशिम : वाशिम ते पुसद महामार्गावरील जांभरूण जहगीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे एखादवेळी मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

^^^^^^^^^

रस्त्यावरील पथदिवे दुरुस्तीची मागणी

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन खेडेगावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

---------------

Web Title: When to get crop compensation