डोईवरचा हंडा उतरणार कधी?
By Admin | Updated: April 19, 2017 19:39 IST2017-04-19T19:39:50+5:302017-04-19T19:39:50+5:30
वाशिम- घडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. डोईवरचा हंडा उतरणा कधी? असा थेट सवाल सोमठाण्यातील महिलांनी बुधवारी जिल्हाधिका-यांकडे उपस्थित केला.

डोईवरचा हंडा उतरणार कधी?
महिलांचा सवाल : सोमठाण्यात भीषण पाणीटंचाई
वाशिम : सोमठाणा (ता. मालेगाव) येथे सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची घडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. दरम्यान, दरवर्षीच भेडसावणारी ही समस्या सुटणार कधी ? डोईवरचा हंडा उतरणार कधी? असा थेट सवाल गावातील महिलांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.
सोमठाणा येथे पाणीपुरवठ्याची कुठलीच व्यवस्था नाही. खासगी विहिरीवरून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो; पण ही विहिर मार्च महिन्यातच कोरडी पडते. त्यामुळे गावकऱ्यांना किलोमीटरभर अंतरावरून उन्हातान्हात पायपीट करीत डोक्यावर पाणी आणावे लागते. विशेषत: महिलांची यात परवड होत आहे. ही समस्या तत्काळ निकाली काढून गावात पाण्याची शाश्वत सोय उभारण्यात यावी, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यावेळी केली.