सांत्वनासाठी गेला अन् गाडी चाेरून आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST2021-02-12T04:38:49+5:302021-02-12T04:38:49+5:30
निधन झाल्यानंतर सांत्वन करण्यासाठी आलेल्या अंदाजे ३५ वर्षांच्या अनोळखी इसमाने तोंडाला मास्क लाऊन राजू कावरखे यांच्या घरी ९ ...

सांत्वनासाठी गेला अन् गाडी चाेरून आला
निधन झाल्यानंतर सांत्वन करण्यासाठी आलेल्या अंदाजे ३५ वर्षांच्या अनोळखी इसमाने तोंडाला मास्क लाऊन राजू कावरखे यांच्या घरी ९ फेब्रुवारी रोजी आला. राजू कावरखे यांचे मृतक बंधू हे माझ्या अत्यंत ओळखीचे होते ते चांगले होते असे सांगून कावरखे परिवाराला सांत्वनपर भेट घेण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी आपण नायब तहसीलदार असल्याची बतावणीसुद्धा केली. मात्र कावरखे यांच्या घरून निघताना कावरखे परिवाराचे लक्ष विचलित करून त्यांची दीड महिन्यापूर्वी विकत घेतलेली नवीन दुचाकी चोरून नेली. मागील दोन दिवसांपासून शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पारडीतिखे हिवरापेन दरम्यान तसेच रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आसेगाव येथे एक नवी दुचाकी अज्ञात व्यक्तीकडून २५ हजार रुपयात विकण्याचा प्रयत्न सुरू होता. ११ फेब्रुवारीला पारडी येथील समीर शा नामक व्यक्तीच्या घरातून काढून आसेगाव येथील संजय नामक युवक घेऊन चालला असता त्याला लोकांनी पकडले व शिरपूर पोलीस स्टेशनला आणून जमा केले.