सततच्या पावसाने खचली शेतातील विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST2021-09-25T04:44:41+5:302021-09-25T04:44:41+5:30

कोंडोली येथून जवळच असलेल्या गव्हा येथील शेत सर्व्हे नंबर १६४ मधील चागल्या स्थितीत असलेल्या विहिरीत सतत चालू असलेल्या पावसाने ...

A well in a field eroded by continuous rain | सततच्या पावसाने खचली शेतातील विहीर

सततच्या पावसाने खचली शेतातील विहीर

कोंडोली येथून जवळच असलेल्या गव्हा येथील शेत सर्व्हे नंबर १६४ मधील चागल्या स्थितीत असलेल्या विहिरीत सतत चालू असलेल्या पावसाने संपूर्ण विहीर पाण्याने भरल्याने ती खचल्याने डुकरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्याकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नसून ते शेतीवरच अवलंबून आहेत, त्यामुळे आता विहीर नसल्याने समोरील पीक कसे घेणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना शासनस्तरावरून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. खचलेल्या विहिरीचा तलाठी, पोलीस पाटील, यांनी पाहणी करून पंचनामासुद्धा केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे डुकरे यांनी सांगितले. तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांतून हाेत आहे.

Web Title: A well in a field eroded by continuous rain