राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  क्रांती ज्योत यात्रेचे मालेगावात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:25 IST2017-08-20T20:24:54+5:302017-08-20T20:25:22+5:30

मालेगाव  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील  सहभागाची माहिती देणा-या क्रांतीज्योत यात्रेचे रविवारी मालेगावात शहरात स्वागत करण्यात आले.

Welcome to Nationalist Tukadoji Maharaj Kranti Jyot Yatra in Malegaon | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  क्रांती ज्योत यात्रेचे मालेगावात स्वागत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  क्रांती ज्योत यात्रेचे मालेगावात स्वागत

ठळक मुद्देस्वातंत्र्य संग्रामातील  सहभागाची माहिती राष्ट्रसंतांचे विचार ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील  सहभागाची माहिती देणा-या क्रांतीज्योत यात्रेचे रविवारी मालेगावात शहरात स्वागत करण्यात आले.
दरवर्षी ९ आॅगस्ट ते ३० आॅगस्टच्या दरम्यान ही यात्रा संपूर्ण विदर्भात मार्गक्रमण करीत असते. ही यात्रा मालेगाव शहरात आल्यानंतर गजानन नगर मध्ये आयोजित समारंभात प्राचार्य प्रकाश कापुरे यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की राष्ट्रसंतांचे विचार ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य या यात्रेमुळे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे वाशिम जिल्हा प्रचारक साहेबराव पाटील होते. आजीवन प्रचारक माणिकराव टोंगे महाराज, नागपूर येथील प्रचारक सावरकर गुरुजी, वर्धा जिल्हा प्रचारक दामोदर पाटिल ,पालखी प्रमुख  डॉ साबळे, प्रमोद देशमुख ,आदी उपस्थित होते. यावेळी अरुण रंगभाळ , गणेश जायभाये ,सुभाषराव घुगे, पंडितराव घुगे , सुरेश मोतेकर, कैलास कोल्हाळ आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदेव सेवा मंडळाचे शहर कार्यकारिणी सदस्य गणेश खरात यांनी तर आभार सुभाष चाटी यांनी मानले.

Web Title: Welcome to Nationalist Tukadoji Maharaj Kranti Jyot Yatra in Malegaon