महाराष्ट्राला भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजीन बनवू
By Admin | Updated: October 13, 2014 00:55 IST2014-10-12T23:45:14+5:302014-10-13T00:55:06+5:30
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची अकोल्यात सभा.

महाराष्ट्राला भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजीन बनवू
अकोला: महाराष्ट्र एकेकाळी विकसित राज्य होते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन होते. त्यामुळे मला नेहमीच महाराष्ट्राचा हेवा वाटायचा; मात्र गत काही वर्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत राज्याचे वाटोळे झाले. सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे, राज्यातही भाजपचे सरकार आल्यास, महाराष्ट्राला पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन बनवू, असा विश्वास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.
अकोल्यातील खुले नाट्य सभागृहात रविवारी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कारभारावर सडकून टीका केली. आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले. मध्यप्रदेशात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच कल्याणासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कधीकाळी महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी मागे असलेले मध्यप्रदेश आता महाराष्ट्राच्या पुढे निघून गेले आहे. देशाचा कृषी विकास दर केवळ तीन टक्के असताना मध्यप्रदेशचा विकासदर २४.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरातचाही विकास झाला; मात्र, केवळ आघाडी सरकारमुळे महाराष्ट्र मागे राहिल्याची खंत चौहान यांनी व्यक्त केली.
*सभा तब्बल साडेतीन तास उशिरा
सकाळी दहा वाजता शिवराजसिंह चौहान यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार खुले नाट्यागृहात सकाळी १0 वाजताच कार्यकर्ते व नागरिक आले. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुद्रित भाषण ऐकवून स्थानिक नेत्यांनी वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मध्यप्रदेशातून आलेल्या नेत्यांच्या खांद्यावर धुरा सोपविली. उत्कृष्ट वक्ते असलेल्या या नेत्यांनी दीड वाजेपयर्ंत मनोगत व्यक्त केले.
*महाराष्ट्रात सिंचन, तर देशात ह्यजीजाजीह्ण घोटाळा
महाराष्ट्रात ७0 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा आणि देशात जीजाजी घोटाळा झाल्याची टिका शिवराजसिंह चौहान यांनी अजित पवार आणि रॉबर्ट वड्रा यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्रात हजारो कोटी रुपये खर्च करुनही सिंचन झालेले नाही. मध्यप्रदेशात मात्र काही कोटी रुपयांतच हजारो हेक्टर शेतजमीनवर सिंचन झाले आहे, असे चौहान यांनी यावेळी सांगितले.