शहापूर येथील पाणीपुरवठा महिनाभरापासून बंद

By Admin | Updated: February 28, 2015 00:54 IST2015-02-28T00:54:33+5:302015-02-28T00:54:33+5:30

मंगरूळपीर पंचायत समिती कार्यालयात महिलांनी दिले निवेदन.

Water supply from Shahapur is closed for a month | शहापूर येथील पाणीपुरवठा महिनाभरापासून बंद

शहापूर येथील पाणीपुरवठा महिनाभरापासून बंद

मंगरूळपीर (जि. वाशिम ) : शहरालगत असलेल्या शहापूर यथे गेली एक महिन्या पासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात गा्रमपंचायतला वारंवार निवेदने व मौखीक स्वरुपात सांगितले परंतु अद्यापपर्यंंत दखत घेतली नाही. त्यामुळे २५ फेब्रुवारीला पंचायत समिती कार्यालयाकडे या संदर्भात असंख्य महिलांनी निवेदन सादर केले. सद्यस्थितीत उन्हाळयाची चाहुल लागली असून प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. शहरालगतच्या शहापूर येथेही ग्रामपंचायतची नळ योजना आहे; मात्र येथील गत महिनाभरापासून ही नळ योजना बंद आहे. त्यामुळे या भागातील अनेक महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंंत भटकंती करावी लागत आहे. यामुळे ङ्म्रम व वेळेचा अपव्यय होत असून, ग्रामस्थांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विविध समस्यांचे निराकरण करण्याची विनंती करण्यासाठी ग्रामस्थ या ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यास अनेकदा या ठिकाणी कर्मचारी व पदाधिकारी गैरहजर असल्याचे त्यांना दिसते. त्यामुळे तक्रार कुणाला द्यावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी दिल्यानंतरही अद्याप दखल घेण्यात न आल्याने उपोषणास बसण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नसल्याचे निवेदनकर्त्या महिलांकडून सांगण्यात आले. उल्लेखनीबाब अशी, की महिनाभरापासून येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळ ग्राम पंचायत स्तरावर ठराव घेवून टँकर मागणी करणे आवश्यक होते; मात्र ग्रामपंचायतने अद्यापही टँकरचा प्रस्ताव सादर न केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या समस्यांबाबत किती गंभीर आहे त्याची प्रचिती येते. या भागातील ग्रामस् थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासह या ठिकाणी टँकर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. शहापूर ग्रामसेवक राजेश ठाक रे यांच्याशी संपर्क साधला असता शहापूर येथील बोअरच्या पाण्याची पातळी घटल्यामुळे ग्रामपंचायतीचे नळ बंद झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मासीक सभेत पाण्याच्या टँकर साठी लवकरच ठराव घेण्यात येईल तसेच या भागातील हातपंप दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Web Title: Water supply from Shahapur is closed for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.