वाशिमला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज
By Admin | Updated: July 10, 2014 22:40 IST2014-07-10T22:40:03+5:302014-07-10T22:40:03+5:30
पाणी पुरवठयाची मुख्य लाईन लिकेज झाली असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.

वाशिमला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज
वाशिम: शहराची जलवाहिनी एकबुर्जी प्रकल्प यामधून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठयाची मुख्य लाईन लिकेज झाली असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. एकबुर्जी प्रकल्प धरणाच्या भिंतीवर मोठया प्रमाणात वृक्ष वाढत असून याकडे संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई असताना दुसरीकडे पाण्याचा मोठया प्रमाणात अपव्यय होताना दिसून येत आहे.