पळसखेड लघुसिंचन प्रकल्पामुळे पाण्याची साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:56+5:302021-03-13T05:15:56+5:30
या लघुसिंचन प्रकल्पामुळे पळसखेड शेतशिवारात सध्या उन्हाळी पिके घेतली जातात. यामध्ये मूग, सोयाबीन, भुईमूग यासहित संत्री-मोसंबी या फळपिकांची सुद्धा ...

पळसखेड लघुसिंचन प्रकल्पामुळे पाण्याची साेय
या लघुसिंचन प्रकल्पामुळे पळसखेड शेतशिवारात सध्या उन्हाळी पिके घेतली जातात. यामध्ये मूग, सोयाबीन, भुईमूग यासहित संत्री-मोसंबी या फळपिकांची सुद्धा लागवड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढले असून, मध्यम जमीन असून सुद्धा या भागातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन आपले जीवनमान उंचावत आहेत. लघुसिंचन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी कूपनलिका यांच्यामधे सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा वाढल्यामुळे अनेक शेतकरी बागायती शेतीकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शेतकरी अंकुश खरात यांना विचारणा केली असता या प्रकल्पामुळे आमच्या जमिनी पाण्याखाली आल्या असून, आता आम्ही या धरणाच्या पाण्याचा उपयोग पूर्णपणे घेत असून, उन्हाळी पिकेसुद्धा आम्ही घेत आहोत. त्यामुळे गावात तसेच परिसरातील खेड्यात शेतकऱ्यांच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर्षी उन्हाळी मूग लावून लघु प्रकल्प सिंचनाचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.