शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनंतर मिळतोय पाणीटंचाईचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:49 IST

वाशिम : सन २0१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर मालक व खासगी विहीर मालकांना पंचायत समिती स्तरावरून आता मिळत आहे.  टँकरने पाणी पुरवठा व विहीर अधिग्रहण यासाठी ८७.९१ लाख रुपये पंचायत समित्यांना मिळालेले आहेत. 

ठळक मुद्देपंचायत समिती स्तरावरून निधी वितरण दिरंगाईचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २0१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर मालक व खासगी विहीर मालकांना पंचायत समिती स्तरावरून आता मिळत आहे.  टँकरने पाणी पुरवठा व विहीर अधिग्रहण यासाठी ८७.९१ लाख रुपये पंचायत समित्यांना मिळालेले आहेत. गतवर्षी जवळपास २५0 गावांत पाणी टंचाई निर्माण झाली होती. या गावांतील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. त्यापोटी ८७.९१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. वारंवार मागणी करूनही टँकर मालक व विहीर मालकांना निधी मिळत नसल्याचे पाहून यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. डिसेंबर महिन्यात शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ६ जानेवारी २0१८ रोजी एकूण ८७ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांना वितरित केला. टँकर  तसेच विहीर मालकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावरून बँक खाते क्रमांक मागविण्यात आले. पडताळणी केल्यानंतर आता टँकर व विहीर मालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. दरम्यान, शासन स्तरावरून निधी मिळण्यास प्रचंड विलंब झाल्याने टँकर व विहीर मालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाशिम तालुक्यात टँकरने पाणी पुरवठय़ासाठी २.५७ लाख तर खासगी विहीर अधिग्रहणसाठी १४.३१ लाख रुपये खर्च झाले होते. हा सर्व निधी पंचायत समितीकडे पाठविण्यात आला असून, संबंधितांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. मालेगाव तालुक्यात टँकरसाठी १२.३१ लाख तर खासगी विहीर मालकांसाठी १२.५५ लाख रुपये, मंगरूळपीर तालुक्यात टँकरसाठी २.७0 लाख तर विहीर अधिग्रहणासाठी १.२६ लाख रुपये, मानोरा तालुक्यात टँकरसाठी ४.५६ लाख तर विहीर अधिग्रहणासाठी ९५ हजार रुपये, रिसोड तालुक्यात विहीर अधिग्रहणासाठी २३.४९ लाख रुपये आणि कारंजा तालुक्यात टँकरसाठी ९.0३ लाख तर खासगी विहीर मालकांसाठी ४.५0 लाख रुपयांचा निधी पाठविण्यात आला. असा एकूण ८७ लाख ९१ हजार रुपयांचा निधी आता टँकर व विहीर मालकांना मिळत आहे.  

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी