कारंजा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ?

By Admin | Updated: November 17, 2014 00:00 IST2014-11-17T00:00:39+5:302014-11-17T00:00:39+5:30

उपाय योजनांसाठी प्रशासनाला सूचना: अधिकारी आश्‍वस्त.

Water shortage crisis at Karanja taluka? | कारंजा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ?

कारंजा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ?

कारंजा लाड (वाशिम): यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे कारंजा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होऊ शकला नसून, तालुक्यातील इतर जलाशयांतही ३५ टक्क्यांच्या आसपासच जलसाठा असल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवन्याची शक्यता आहे. कारंजा तालुक्यात १६७ गावे आहेत. तालुक्यातील उजाड गावे वगळता १३१ गावे आहेत. त्यापैकी किमान १८ गावांत यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ही समस्या लक्षात घेऊन सबंध शासकीय यंत्रणा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करीत आहे. यासाठी गावातील विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकरची व्यवस्था करण आवश्यक आहे. पाणीटंचाईचे संभाव्य संकट विचारात घेऊन नवनिर्वाचित आमदार राजेंद्र पाटणी यांनी १५ नोव्हेंबर रोजी कारंजा पंचायत समितीमध्ये सर्व संबंधित अधिकार्‍यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी योजना तयार केली. या वर्षी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम हातातून गेला व रब्बी हंगामात पाण्याचा बेसुमार उपसा झाला, तर तालुक्यावर जलसंकट ओढवणार आहे. आमदार पाटणी यांनी पाणीटंचाईबाबत संबंध तालुक्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या आहेत. कारंजा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या त्या संदर्भातील योजनांवर पाणीटंचाई सभेत चर्चा करण्यात आली. पाणीटंचाईचा सामना सर्व सुविधांसह कसा करता येईल. या संबंधीही सभेत चर्चा झाली. वाशिम जिल्हय़ातील अडाण प्रकल्पाचे व्यवस्थापन जीवन प्राधीकरणाच्या यवतमाळ विभागाकडून करण्यात येते आणि या विभागाच्या क ारंजा शाखेनुसार अडाण प्रकल्पात शहराला पुरेल एवढय़ा प्रमाणात पाणीसाठा आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असताना विज रोहित्र वेळेवर मिळत नसल्याचे मत व्यक्त करून ही सडलेली यंत्रणा सुधारण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे मतही पाटणी यांनी यावेळी व्यक्त केले होते. एकंदरीत स्थिती पाहता क ारंजा तालुक्यात जलसाठा पुरेसा नसला तर, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन पूणपणे ाज्ज असल्याचे दिसत आहे. मजीप्रा कारंजा विभागाचे शाखाधिकारी प्रसाद नुलकर यांनी लोकमत प्र ितनिधीशी बोलताना कारंजा शहरास पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात सद्यस्थितीत पुरेसा जलसाठा असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी ३५ टक्केच जलसाठा असल्याचे स्पष्ट करून प्रशासन पाणीटंचाईची परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले. आवश्यकता असल्यास विहीर अधिग्रहण व टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Water shortage crisis at Karanja taluka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.