वाशिम जिल्हावासीयांना पाणीटंचाईच्या झळा

By Admin | Updated: January 5, 2016 02:06 IST2016-01-05T02:06:24+5:302016-01-05T02:06:24+5:30

पेयजलच्या आराखड्याला मंजुरीच नाही: उन्हाळ्यात संकट गंभीर.

Water scarcity of water to the residents of Washim | वाशिम जिल्हावासीयांना पाणीटंचाईच्या झळा

वाशिम जिल्हावासीयांना पाणीटंचाईच्या झळा

वाशिम: जिल्ह्यात ऐनहिवाळ्यात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना एक ते दोन किमीवरून पाणी आणावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात आलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळाली नाही. प्रत्येक तालुक्याने उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारण्याचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे पाठविला आहे. सध्या या आराखड्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाठविलेल्या आराखड्यात ८३ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्याची कामे प्रस्तावित केली आहेत.

Web Title: Water scarcity of water to the residents of Washim