शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

राजूरा परिसरातील गावांना पाणीटंचाईच्या झळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:29 IST

  राजूरा (वाशिम) : परिसरातील अनेक गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेषत: महिलांना डोईवर हंडा घेवून पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.

- यशवंत हिवराळे   राजूरा (वाशिम) : परिसरातील अनेक गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेषत: महिलांना डोईवर हंडा घेवून पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करून ग्रामस्थांना जाणवणारी समस्या दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.कधीकाळी संपूर्ण मालेगाव शहराची तहान भागवून राजूरा परिसरातील कुरळा, सुकांडा, राजूरा, डव्हा, नागरतास येथील शेकडो हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरविणाºया कुरळा तलावाची देखभाल-दुरुस्ती व योग्य नियोजनअभावी आजमितीस दुरवस्था झालेली आहे. या तलावातील पाण्याच्या भरोशावर सुकांडा, कुरळा, नागरतास आदी गावांमधील शेतकºयांकडून गव्हाचे विक्रमी उत्पन्न घेतले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षात पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन व तलावात दरवर्षी साचणाºया गाळामुळे तलावाची पाणीपातळी वर्षागणिक खालावत चालली आहे. यंदा देखील सद्या या तलावात जेमतेम पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. कुरळा तलाव हा जवळपास ५४ हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर विस्तारलेला आहे. या तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी फार जुनी आहे. अनेकदा या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, जनतेच्या पदरी आश्वासनाखेरीज काहीच पडू शकले नसल्याचे वास्तव आजही कायम आहे. राजूरा येथून जवळच असलेल्या खैरखेडा येथील जलस्वराज्य प्रकल्पाचा जलस्त्रोत देखील निकामी ठरला आहे. परिणामी, नदीपात्रातील ज्या पाण्यावर गुरे, ढोरे, कुत्रे पाणी पितात, महिला धुणे धुतात, त्याच झºयातील दुषीत पाण्यावर दरवर्षीच्या उन्हाळ्यात खैरखेडा येथील ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत असल्याची भयावह स्थिती आहे.खैरखेडा हे मालेगाव तालुक्यातील टँकरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीसमस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी खर्च झाला; परंतु त्याचा विशेष फायदा झालेला नाही. तथापि, यावर्षी देखील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ती निकाली काढण्याकरिता टँकरव्दारा तत्काळ पाणीपुरवठा सुरू करणे गरजेचे ठरत आहे.राजूरा येथून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या सुकांडा या गावातही दरवर्षीप्रमाणे यंदा एप्रिलच्या सुरूवातीपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन हजारावर लोकसंख्या असलेल्या सुकांडा येथे काही वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प कार्यान्वित झाला. मात्र, या योजनेला पाणीपुरवठा करणारा जलस्त्रोतच ‘वांझोटा’ ठरल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्या ग्रामस्थांची तहान भागविणाºया गावातील सार्वजनिक पाच विहीरी, सहा हातपंपासह खासगी कुपनलिकांनी दम तोडला आहे. त्यामुळे प्रशासनाने गावात तत्काळ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई