जलशुद्धीकरण केंद्र १२ वर्षांपासून बंद!
By Admin | Updated: April 19, 2017 18:12 IST2017-04-19T18:12:57+5:302017-04-19T18:12:57+5:30
जलशुद्धीकरण केंद्राचे २००५ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र, हे केंद्र तेव्हापासून आजतागायत बंदच

जलशुद्धीकरण केंद्र १२ वर्षांपासून बंद!
अनसिंग : सन २००५ मध्ये लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र तांत्रीक अडचणींमुळे गेल्या ११ वर्षांपासून सुरूच झाले नाही. परिणामी, अनसिंगवासीयांना आजही दुषित पाणी प्यावे लागत आहे.
अनसिंगपासून जवळच असलेल्या उमरा शमशोद्दीने येथे जलशुद्धीकरण केंद्राचे २००५ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र, हे केंद्र तेव्हापासून आजतागायत बंदच असल्याने धरणामधील पाणी विना ह्यफिल्टरह्ण जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे पिण्यास योग्य नसलेले हे पाणी इतर कामांसाठीच वापरले जात असून पिण्याच्या पाण्याकरिता अनसिंग येथील ग्रामस्थांना पैसे खर्चून ह्यफिल्टर कॅनह्णचे पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी अनसिंग येथे जोर धरत आहे.