पाणीप्रश्नी नागरिकांची नगर परिषदेवर धडक
By Admin | Updated: May 9, 2015 01:47 IST2015-05-09T01:47:40+5:302015-05-09T01:47:40+5:30
वाशिम शहरात गढूळ व दूषित पाणीपुरवठा.

पाणीप्रश्नी नागरिकांची नगर परिषदेवर धडक
वाशिम : शहरातील काही भागात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ८ मे रोजी शहरातील काळे फैल भागात करण्यात आलेला पाणी पुरवठा दूषित असल्याने या भागातील नागरिकांनी नगर परिषदेवर धडक दिली. वाशिम येथील काळे फैल भागात नवीन पाईपलाईनचे काम अद्याप झाले नसल्याने जुन्या पाईप लाईनवरुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठ दिवसातून एकदा होत असलेला पाणी पुरवठाही गढूळ होत असल्याने लहान बालकांना अतिसारासह विविध आजार दडत असल्याचे नगर परिषदेवर गेलेल्या नागरिकांनी नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.पी. शेवदा यांना सांगितले. जुनी पाईप लाईन असून, नवीन पाईप लाईनचे काम अद्याप बाकी आहे. जुनी पाईप लाईन असल्याने गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे शेवदा यांना सांगितले. यावेळी नगर परिषद मु ख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सभेला ते गेल्याने त्यांचे म्हणणे कळू शकले नाही. यासंदर्भात पाणीपुरवठा सभापती अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भागात सध्या जुन्या पाईप लाईनमधून पाणीपुरवठा होत असल्याने गढूळ पाणीपुरवठा झाला असावा.