मानोऱ्यातील ७ ग्रामपंचायतींमधील दावेदारांच्या मनसुब्यावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:34+5:302021-02-05T09:25:34+5:30
मानोरा तालुक्यातील मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यापैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तर ...

मानोऱ्यातील ७ ग्रामपंचायतींमधील दावेदारांच्या मनसुब्यावर पाणी
मानोरा तालुक्यातील मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यापैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तर इतर २१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. या २२ ग्रामपंचायतींसह इतर ५४ ग्रामपंचायती मिळून ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले. त्यात अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी १०, नामाप्रसाठी २१, तर सर्वसाधारणसाठी ३४ जागा सरपंचपदासाठी राखीव झाल्या. तथापि, निवडणूक पार पडलेल्या आणि पूर्वी आरक्षण जाहीर झालेल्या सात ठिकाणच्या नामाप्र आरक्षणात बदल झाला आहे. पूर्वी नामाप्र आरक्षणात समाविष्ट असलेल्या विठोली, पारवा, आमदरी, पोहरादेवी, सिंगडोह, खापरदरी, भोयणी येथे बदल झाल्याने, या ठिकाणच्या इच्छुकांसह या सात जागांवर समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमधील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.