शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पुराचे पाणी घुसले शेतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 12:47 IST

वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह परिसरातील शेकडो हेक्टर शेतांत हे पाणी घुसले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त प्रकाशित करून या संदर्भात महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधले होते, हे विशेष.शेलुबाजार : शुक्रवारी दुपारनंतर शेलुबाजार परिसरातील गोगरी, हिरंगी, लाठी, चिखली, कंझरा, पिंप्री अवगण या गावात धो-धो पाऊस कोसळल्याने नदीनाल्याना पुर आला. यामुळे पेरणी केलेली बियाणे वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ३२ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.मंगरुळपीर ते शेलूबाजार दरम्यान राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाच्यावतीने रस्त्याचे काम सुरु आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेलूबाजार व खंड्या नाल्याच्या पुलाचे काम सुरु करण्यात आले. पुलाचे काम करताना वाहतुकीसाठी योग्यरित्या पर्यायी रस्ता तयार केला नाही तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे कामही केले नाही. शुक्रवारी पहिल्याच पावसामुळे पूर आल्याने सायंकाळी ४ वाजेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मंगरुळपीर-शेलुबाजार मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे पहिल्याच पावसात वाहनधारकांसह शेतकºयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अडान नदीच्या ठिकाणी पर्यायी रस्ता तयार करताना पाईप टाकणे गरजेचे होते. परंतु पाईप टाकण्यात आले नाहीत. अडान नदी व खंड्या नाल्याला आलेल्या पुरामुळे निर्माणाधिन पुलाला धक्का बसण्याची भीती वर्तविली जात आहे. पुरामुळे अडाण नदीवरील पुलाखाली उभारण्याच्या आलेल्या ‘सेंट्रींग’चा काही भाग खाली कोसळला.‘लोकमत’ने वेधले होते प्रशासनाचे लक्षजिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने नाल्याच ठेवल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात जाऊन नुकसान होण्याची शक्यता ‘लोकमत’ने २७ जूनच्या अंकात वर्तवून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, याऊपरही याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. २८ जून रोजी शेलुबाजार परिसरात धो-धो पाऊस झाला असून, या पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडाण नदी पात्रावर पूल बांधकाम सुरू असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या ठेवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेकडो एकर शेतीत पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यातील काही क्षेत्रात शेतकºयांनी पेरणीही केली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी