शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात तहानलेल्यांसाठी ठिकठिकाणी ‘पाणपोई’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:07 IST

शहरात, ग्रामीण भागासह मुख्य रस्त्यावर पाणपाई (प्याऊ) उभारुन नागरिकांची तहान भागविण्याचे कार्य हाती घेतले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  उन्हाळयाच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठया प्रमाणात आवश्यकता भासते. अशावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू नये याकरिता अनेक समाजसेवक, समाजसेवी संघटनांसह नागरिकांनी शहरात, ग्रामीण भागासह मुख्य रस्त्यावर पाणपाई (प्याऊ) उभारुन नागरिकांची तहान भागविण्याचे कार्य हाती घेतले आहे. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवर ग्रामीण भागातून येणारी जनता आपली तहान भागवितांना दिसून येत आहे. तसेच वाशिम येथून चोहोमार्गावर शहरानजिक व शहराबाहेर अनेकांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था्र केली आहे. वाशिम येथून अकोला मार्गावर जातांना सावरगाव बर्डे फाटयावर एका समाजसेवकांने थंड पाण्याची व्यवस्था फाटयावर केली. रिसोड रस्त्यावर वांगी फाटा, सवड फाटयासह अनेक ठिकाणी पाणपोई लागलेली दिसून येत आहे. हिंगोली रस्त्यावर गावाबाहेर गेल्याबरोबर एका धाबा मालकाने पाणपोईची व्यवस्था केली. तसेच मंगरुळपीर , शेलुबाजार रस्त्यावरही पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. मंगरुळपीर रस्त्यावर महादेव मंदिराच्या बाजुला भव्य अशी पाणपोई एका नागरिकांनी उभारुन या रस्तयावरुन येºजा करणाºया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. उन्हाळयात या सुरु केलेल्या पाणपोईमुळे जिल्हयातील नागरिकांची तहान भागविण्याचे महान कार्य यांच्या हातून होत आहे.भारतीय जैन संघटनेकडून नागरिकांकडून शुध्द पाण्याची व्यवस्थाभारतीय जैन संघटना शाखा मेडशीच्यावतिने रस्त्यावरुन येºजा करणाºया नागरिकांसाठी शुध्द आरओची पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना शाखा मेडशीचे  अध्यक्ष प्रेमचंद जैन , ब्राम्हणवाडा येथील प्रकाश सानप, मालेगाव येथील जगदीश पहारे , मेडशी येथील विजय तायडे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पुढाकाराने सदर पाणपोई उभारण्यात आली असून येथे नागरिकांना शुध्द व थंड पाणी मिळत आहे. थंड पाण्यामुळे नागरिकांची तहान भागविण्याचे महान कार्य या व्यक्तिंकडून सुरु केल्याने रस्त्यावरुन जाणाºयां नागरिकांच्यावतिने त्यांचे आभार व्यक्त केल्या जात आहे. तसेच सदर उपक्रम ईतरांनीही राबवून उन्हाळयाच्या दिवसात पाण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचे आवाहन या मान्यवरांच्यावतिने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीSocialसामाजिक