शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Water Cup Competition ११ गावातील नागरिकांचे श्रमदान; ४२१४ घनमीटरची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 3:04 PM

मंगरूळपीर (वाशिम) : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळावर मात म्हणून जलसंधारणांच्या कामांसाठी मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांत नागरिकांची एकजूट बघावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळावर मात म्हणून जलसंधारणांच्या कामांसाठी मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांत नागरिकांची एकजूट बघावयास मिळत आहे. ११ गावातील २८७१ नागरिकांनी श्रमदान करून ४२१४ घनमीटरची कामे एका दिवसात १ मे रोजी केली आहेत.राज्यात गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्गत १ मे हा महाश्रमदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. मंगरुळपीर तालुक्यात पिंप्री खुर्द या गावासह जांब, बोरव्हा बु., नागी, जोगलदरी, चकवा, लखमापुर, गणेशपुर, जनुना बु., चिंचाळा ,  पिंप्री अवगण, माळशेलू या ११ गावांत श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मुख्य कार्यकारी दिपककुमार मीणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, उपविभागीय अधिकारी गोगटे, तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी टाकरस, उमेदचे श्रद्धा चक्रे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यासह विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, भुसावळ, नागपुर, वर्धा, अमरावती, पुणे येथून जलमित्र सुद्धा श्रमदान करण्यासाठी आले होते. वॉटर कप स्पर्धेसाठी मंगरुळपीर तालुक्याचे हे दूसरे वर्ष असून या वर्षी ५९ गावाने स्पर्धेत सहभाग घेतला. २० गावांत जलसंधारणची कामे श्रमदानमधून तर कुठे मशीनद्वारे कामे सुरू आहेत.  तालुक्यातील ११ गावातही मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदींनीसुद्धा सहभाग घेतल्याने गावकºयांचा उत्साह वाढला आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी गावकºयांची एकजूट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर कामाला जलचळवळीचे स्वरुप आले असल्याचा दावा केला जात आहे. जलसंधारणांच्या कामांसाठी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, अतुल तायडे, चेतन आसोले, कल्याणी वडस्कर, मयुरी काकड़, दिपमाला तायडे, निलेश भोयरे, अक्षय सर्याम, आश्विन बहुरूपी, जलमित्र गोपाल भिसडे, देवानंद काळबांडे आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा